Press "Enter" to skip to content

गोरेगावात जागतिक योगादिन उत्साहात संपन्न !

मुंबई(पी.डी पाटील): योग हा भारताचा प्राचीन व अनमोल वारसा आहे. शरीर, मन व आत्मा यांचा समतोल साधणारी विद्या आता जागतिक स्तरावर मान्यता पावली आहे. याच अवचित्य साधून, अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विद्यमाने, जागतिक योगा दिन, विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या कार्यालयात, उत्साहात संपन्न झाला.

अनिर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थेपिका – अंजली सरकाळे यांनी योग ही केवळ शारीरिक क्रिया नाही, तर जीवनाची एक कला आहे. शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन साधून आपण अधिक सकारात्मक, आरोग्यपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकतो. व रोजच योगा करा,असे उपास्थिताना मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ नागरिकांनी व योगा महिलानी योगाची प्रत्यक्षित व प्रकार सादर करून, मन व शरीर स्वस्त कसे ठेवावे व आपले मानसिक संतुलन आणि आरोग्य या बाबतची माहिती दिली.

या सोहळ्यास अनिर्वेद च्या उपाध्यक्षा – अश्विनी बोरगावकर, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष – शैलजा बोन्द्रे, सावली परब, अश्विनी नाखरेकर, हळदणकर सर, विजय केसरकर, नंदकुमार खुळे व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिर्वेद ट्रस्ट आज पर्यंत अंध दिव्यांग यांना विविध उपक्रमातून आर्थिक मदत करीत असते. अंध दिव्यागं, स्वप्नील कदम यांना धनादेश देऊन आर्थिक सहाय्य केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.