

प्रतिनिधी (अजय शिवकर) आरोग्यम धन संपदा माणसाचे आरोग्य हा अनमोल ठेवा आहे उत्तम आरोग्य आणि प्रगत विचार हीच खरी आपल्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे 21 जून अंतर राष्ट्रिय योग दिवस या दिवसाचे औचित्य साधत ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स आवरे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक श्री. नंदलाल पाटील, सौ. रोहिणी गोरे आणि श्री. सुनील जानकर यांनी विद्यार्थ्याना योगासने करून दाखविली.
यावेळी श्री. राजेंद्र ठोंबरे सर आणि सौ. आश्विनी काळे या सहजयोगातील तज्ञ मार्गदर्शकांनी परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोग विद्यार्थ्याना समजावून सांगितला. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, ताण तणाव कमी होतो. त्याचा बरोबर स्मरण शक्तीचा विकास, मनशांती आणि आनंद मिळवण्यासाठी ध्यान धारणा करणे आवश्यक आहे. विविध प्रात्यक्षिके करून सहजयोग आणि ध्यान धारणेचे महत्व पटवून दिले. मुलुंड येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र अहिरराव सर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण चिरलेकर, पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य सुभाष ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. निवास गावंड यांनी केले.
कोपरखैरणे आणि नेरूळ येथील जेष्ठ सहजयोगी श्री. जयराम मुकादम, सौ. सुवर्णा मुकादम, श्री. बाबुराव रणवरे, श्री. राहुल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले.सदर प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते




Be First to Comment