पाली ग्रामपंचायतीचे गणेशोत्सवासाठी जिल्हा बाहेरून येणाऱ्या लोकांना आवाहन
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
गणेशोत्सवासाठी पाली ग्रामपंचायत हद्दीतील गावांत गुरुवार (दि.13) पासून कोणीही जिल्ह्याबाहेरून येणार असेल त्यांनी कोव्हीड 19 ची टेस्ट करून रिपोर्ट आणणे गरजेचे आहे. आपलं आणि इतर गावे विषाणू मुक्त राखण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन पाली ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले. सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या या पाश्वभूमीवर प्रशासन स्थरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ठिकठिकाणच्या बुथवर ग्रामपंचायतीने तपासणीसाठी प्रतिनिधी नेमले आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याबाहेरून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या लोकांनी कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट लॅब मधून कोव्हीड 19 ची टेस्ट करून घायची आहे. सोबत रिपोर्ट किंवा मान्यताप्राप्त प्रत असावी तरच गावातून प्रवेश मिळणार आहे. असे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.






Be First to Comment