Press "Enter" to skip to content

जनता दल सेक्युलरच्या जिल्हा चिटणीसपदी विजय खारकर

सिटी बेल लाइव्ह / उरण  (विठ्ठल ममताबादे )

जनता दल सेक्युलर पक्षाच्या रायगड जिल्हा सचिव पदी रसायनी येथील विजय नामदेव खारकर यांची नियुक्ती पक्षाचे प्रधान महासचिव प्रताप होगाङे यांनी प्रदेश अध्यक्ष आ.प्रा.शरद पाटील यांच्या आदेशाने केली आहे.

राजकीय पक्षातील कार्याचा व विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेसाठी कार्य करण्याचा दांडगा अनुभव विजय खारकर यांना आहे. त्याचा उपयोग करून पक्षाच्या विस्ताराचे काम रायगड जिल्ह्यात करण्याची जबाबदारी पक्षाच्या राज्य नेतृत्वाने त्यांच्यावर सोपविली आहे असे जनता दल सेक्युलर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास बने यांनी सांगितले आहे. विजय खारकर यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून सर्वस्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खारकर यांच्या नियुक्तीमुळे पक्षाचा विस्तार होण्यास मदत होणार आहे खारकर यांच्या नियुक्ती मुळे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.