Press "Enter" to skip to content

चेअरमन बबनदादा पाटील यांच्या शिपेचात मानाचा तुरा

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक चे बी+ मानांकन प्रदान

पनवेल दि.२१(वार्ताहर): तळोजा येथील कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक चे बी+ मानांकन मिळाले असून त्यांच्या शिपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक चे बी+ मानांकन नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने भेट दिली होती. या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदने कॉलेजला २.५२ सी.जी.पी.ए. सह ‘बी+’ हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या अभुतपूर्व यशाने कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या देदीप्यमान यशाबद्दल कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांनी सर्व मान्यवर पदाधिकारी, व्यवस्थापक मंडळ, मुख्यध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.