
सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत, तसेच शारीरिक आणि आध्यात्मिक वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल शहरातून प्रथमच पनवेल रायडर्स यांच्यावतीने पनवेल ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या वारीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भगवा झेंडा फडकावून या सायकल वारीचा शुभारंभ झाला.

यावेळी त्यांनी सर्व सहभागी सायकलस्वारांचे अभिनंदन केले. तसेच, आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षितपणे प्रवास करा, अशा शुभेच्छा दिल्या. २० ते २२ जून या तीन दिवसांत ही वारी पूर्ण होणार असून, या अनोख्या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचणार आहे. यावेळी माजी नगरसेवक गणेश कडू यांच्यासह पनवेल रायडर्सचे सदस्य उपस्थित होते.




Be First to Comment