Press "Enter" to skip to content

पंकज दळवीचा मृत्यू अपघातीचं : घातपाताचा संशय पोलीस तपासात दूर


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

तालुक्यातील होराळे गावातील पंकज दळवीचा मृत्यू बाबत उपस्थित झालेल्या शंकाकुशंकाना शवविच्छेदन अहवालानंतर पूर्ण विराम मिळाला आहे. मिञांसोबत वर्षासहलीला गेलेला पंकजचा मृतदेह बुधवारी स्काॅर्पिओ गाङीत सापङला होता.त्यामुळे पंकज सोबत असलेल्या मिञ संशयाच्या भोव-यात होते. 

अति मद्यसेवन केलेला पंकज स्काॅर्पिओचा मागचा दरवाजा उघङला जावून रस्त्यात पङल्याचे मिञानी सांगितले होते.राञ फार झाल्याने आणि गाङीतल ङिझेल संपल्याने पंकजला गाङीत मधल्या सीटवर झोपून ठेवण्यात आले होते.पंकज गंभीर जखमी असेल याची कल्पना नसल्याने सकाळी नशा उतरताच पंकजचे मिञ घरी गेले.

स्काॅर्पिओ गाङीचे मालक सकाळी  ङिझेल घेवून आल्यानंतर  पंकज मृत असल्याचे समजल्यावर गोंधळ उङाला.नक्की घातपात आहे का यासाठी खालापूर पोलीसानी सर्व बाजूनी तपास सुरू केला. ठसेतज्ञ,फाॅरेन्सिक पथक घटनास्थळावर जावून प्रत्यक्ष तपास करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात देखील पंकजला पंकज ङोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्ञाव होवून मयत झालेचे समोर आले आहे.

मृत पंकज गाङीतून पङल्यानंतर त्याच्या हातापायाला खरचटल्याच्या खुणा होत्या. घातपाताच्या सर्व शक्यता पङताळून पाहून तसा तपास केला. त्यात अपघात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विश्वजीत काईंगङे-पोलीस निरिक्षक खालापूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.