Press "Enter" to skip to content

राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी शासनाने दक्षता घ्यावी 

मनसेचे रुपेश पाटील यांचे पेण पोलिसांना तसेच तहसीलदारांना निवेदन

सिटी बेल लाइव्ह / पेणशहर-(प्रशांत पोतदार)

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे झेंडे उपलब्ध होत असतात. आता कोरोना व्हायरसचे वातावरण असल्यामुळे तिरंगा छापलेले मास्क बाजारात विक्रीस आल्याचे निदर्शनास आलेले आहे. खरे तर कोणत्याही राष्ट्राच्या ध्वजाचा मास्क किंवा शासनाने घालून दिलेल्या नियमा व्यतिरिक्त ध्वजाचा वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान असून कायद्याने गुन्हा देखील आहे .बाजारात तिरंगा छापलेले मास्कचा वापर काही अज्ञानी लोकांकडून व लहान मुलांकडून होण्याची शक्यता असल्याने तसेच त्याचा गैरवापर तसेच इतरत्र टाकण्याची शक्यता आहे.

असे राष्ट्रध्वजाचा अवमान करणे टाळण्यासाठी मनसे कडून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच शासनाने ही राष्ट्रध्वजाचा अवमान शासनानेही राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याकामी दक्षता घ्यावी यासाठी पेण पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव रुपेश पाटील यांनी मनसेच्या वतीने निवेदन दिले.

बाजारात आलेले मास्क

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.