Press "Enter" to skip to content

‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’

२३ जूनपासून होणार भव्य सुरुवात १६ शाळांमधील सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग 

पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य आणि नेतृत्वगुणांची जोपासना व्हावी या हेतूने ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ २३ जूनपासून भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित केली आहे. यावर्षी स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे. 

            हि स्पर्धा वर्ग अंतर्गत फेरी, शाळा अंतर्गत फेरी आणि शालेय अंतिम फेरी होणार असून निवडक ६०० स्पर्धकांमधून अंतिम ६० विजेते ठरणार आहेत. मागील वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही तितक्याच उत्साहात स्पर्धा पार पडणार आहे. १६ शाळांमधून सुमारे १३ हजार विद्यार्थी सहभाग घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, चांगू काना ठाकूर विद्यालय (इंग्रजी माध्यम) नवीन पनवेल, चांगू काना ठाकूर विद्यालय (मराठी माध्यम) नवीन पनवेल, सुषमा पाटील विद्यालय कामोठे, लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय कामोठे, तसेच पनवेल महानगरपालिकेच्या १० प्राथमिक शाळांचा सहभाग असणार आहे.  या स्पर्धेत एकूण ५ हजार बक्षिसे असून १४०० पदके, ४०० ट्रॉफी, तसेच ६० चॅम्पियन ट्रॉफी असणार आहेत. अधिक माहितीसाठी ७५०२१००१०० या क्रमांकावर संपर्क करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

“ प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःला उत्कृष्ट पद्धतीने व्यक्त करता यावे, हीच आमची भावना आहे. वक्तृत्व स्पर्धा ही आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढवण्यासाठी प्रभावी साधन आहे.” त्यामुळे यंदाही ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. – परेश ठाकूर, अध्यक्ष कोशिश फाउंडेशन

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.