
श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या पावन प्रसंगी आमदार मा. श्री. विक्रांत दादा पाटील यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत पालखी सोहळ्यात सहभागी होऊन अध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ,आमदार विक्रांत दादा पाटील व इतर सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वारकऱ्यांचे स्वागत केले. तसेच श्रीक्षेत्र देहू व परिसरात महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविक वारकऱ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शतकानुशतके अखंड सुरू असलेली ही वारी परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची मूर्त प्रतीक आहे. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माउलींच्या पावन पालख्यांद्वारे जो भक्तीचा संदेश प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत पोहोचतो, तो आजही समाजमनाला उजळून टाकणारा आहे.




“जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले,तेव्हा या विठ्ठले कृपा केली” या संतवाणीप्रमाणे, माझ्या अनेक जन्मांची पुण्याई व नागरिकांच्या आशीर्वादामुळे आज या पवित्र व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक, पुण्यदायी आणि आत्मिक समाधान देणारी अनुभूती आहे. महाराष्ट्राच्या व भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचा व संतांचा मोठा वाटा आहे. संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मन भरून आलं. हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील.” असे मत आमदार विक्रांत दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
वारीच्या यशस्वी आयोजनासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने विशेषतः अतिशय भरीव आणि प्रभावी योजना राबविल्या आहेत. वारी मार्गावरील रस्त्यांचे दुरुस्तीकरण, वीज व पाणीपुरवठा, वारकऱ्यांकरिता आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट्स, स्वच्छता व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, वारी नियंत्रण कक्ष आणि आपत्कालीन सेवा या सर्व बाबींसाठी राज्य सरकारने प्रभावी नियोजन केले आहे. तसेच प्रवासी विठ्ठल भक्तांकरिता 5200 बसचे विशेष नियोजन यावर्षी आमच्या सरकारने केले असून याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील अभिनंदन व आभार आमदार विक्रांत दादा पाटील यांनी मानले.
या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण साहेब, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवीताई नाईक, माजी मंत्री श्री. बाळा भेगडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अनुप मोरे, श्री. शत्रुघ्न काटे, गणेशजी भेगडे, रविंद्र भेगडे, रघुवीर शेलार व इतर सर्व संत मंडळी व वारकरी भक्तगण उपस्थित होते.




Be First to Comment