सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #
क्षत्रिय मराठा समाजाच्या कार्यकर्त्या सर्वांशी नेहमीच हसतमुखाने वागणाऱ्या जेष्ठ समाजसेवक सुनील शिंदे यांच्या सहचारिणी वर्षा सुनील शिंदे यांचा वाढदिवस मोठया आनंदाने साजरा करण्यात आला.
माथेरान काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज खेडकर यांनी आपल्या निवासस्थानी वर्षा शिंदेंना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोगी दीर्घायुष्या साठी सहृदयता पूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी काँग्रेसचे नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, नागरी सहकारी पतसंस्था सभापती हेमंत पवार, सामाजिक कार्यकर्ते नितीन शहा, अरविंद रांजणे, बिलाल महापुळे,यशस्वी युवा उद्योजक भास्करराव शिंदे,धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.






Be First to Comment