Press "Enter" to skip to content

रोह्यात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली नऊशेच्या उंबरठ्यावर

रोहा तालुक्यात आज कोरोनाचे २५ नवीन रुग्ण

सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)

     रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आज १३ ऑगस्ट रोजी पुन्हा तालुक्यात कोरोनाचे २५ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ८८३ वर पोहोचली आहे.

आज आढळून आलेल्या नवीन २५ रुग्णांमध्ये सुयश संकुल सेवादल आळी १, पी डब्ल्यू कॉलनी१,आदर्श नगर भुवनेश्वर२, झोलांबे १,कचेरी रोड१,सुयश संकुल रोहा २, वाघेश्वर नगर १,महादेव वाडी कोलाड १,तलवली तर्फे अष्टमी १,श्रीकृष्ण नगर १,श्री दर्शन रेसिडेन्सी १,विष्णुनगर१,छत्रपती शिवाजी नगर१,कचेरी रोड पी डब्ल्यू कॉलनी१, बोरघर १, सुविद्य कॉलनी२,शांती नगर१,आंबेवाडी १,पाईप नगर सुकेळी १, नागोठणे १,गुरव आळी १वालचंद कॉलनी बाजारपेठ नागोठणे १ या सर्वांची कोरोना टेस्ट आज पॉझिटीव्ह आली आहे.

दरम्यान, आज आढळून आलेल्या २५ नवीन रुग्णांमुळे रोहा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८८३ वर पोहोचली आहे.सध्या २६७ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात २० जण मयत झाले आहेत.तर ५९६ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.तरी घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.