Press "Enter" to skip to content

शनिमंदिरांची सात्त्विकता राखा; ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवा!

वक्ता : – श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर नुकतेच मुसलमान कर्मचाऱ्यांमार्फत ग्रील बसवण्याचे धक्कादायक व भावना दुखावणारे कृत्य घडले. मंदिराची पवित्रता व परंपरा न पाळणाऱ्या अन्य धर्मीय कर्मचाऱ्यांना चौथऱ्यावर येऊ देणे ही मंदिराच्या सात्त्विकता आणि धार्मिक परंपरा यांचा स्पष्ट भंग करणारी आहे. या प्रकाराविषयी स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

मंदिरात कार्यरत असलेल्या ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना तात्काळ हटवण्यात यावे, तसेच त्यांना कामावर ठेवणाऱ्या व मंदिरात प्रवेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तेलंगणातील तिरुपती बालाजी मंदिरातही अशा प्रकारची घटना घडल्यानंतर तेथील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी फक्त हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र सरकारनेही तत्काळ अशीच ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.