Press "Enter" to skip to content

मुंबई-गोवा हायवे मध्ये गेलेला ५०० मिटरचा रस्ता ही चिखलात

गोवे ते मुठवली दोन महिन्यापूर्वी बनविण्यात आलेला नवीन रस्त्याचे तिनेतेरा,रस्ता पूर्ण पणे खचला,रस्त्याला गेले तडे, साईड पट्ट्या व मोऱ्यांचे काम ही निस्कृष्ठ दर्जाचे

रोहा : समीर बामुगडे

     रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे, मूठवली ते शिरवली दोन महिन्यांपूर्वी बनविण्यात आलेल्या नवीन रस्त्याचे तिनेतेरा वाजले असुन हा नवीन बनविण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खचला असुन या रस्त्याच्या साईड पट्ट्या ही निस्कृष्ठ दर्जाच्या बनविण्यात आल्या आहेत हे एकंदरीत परिस्थिती वरुन लक्षात येत आहे.तसेच मुंबई-गोवा हायवे मधील गोवे गावाकडे जाणारा ५०० रस्ता ही चिखलात गेला आहे. यामुळे प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
        पंतप्रधान ग्रामीण सडक योजने अंतर्गत ४ कोटी ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी खर्च करून गोवे ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई गोवा हायवे पासुन गोवे, मुठवली ते शिरवली मार्गी खांब मुंबई गोवा हायवे पर्यंत ५ किलोमीटर रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. परंतु बनविण्यात आलेल्या रस्त्याचे काम, साईड पट्ट्यांचे काम, तसेच मोऱ्यांचे काम निस्कृष्ठ दर्जाचे आहे हे एकंदरीत परिस्थिती वरून दिसून येत आहे.यामुळे या मार्गानी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी वर्ग, प्रवाशी नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया गोवे ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
           पंतप्रधान ग्राम सडक योजना ही ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी आणि आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना असुन यामुळे ग्रामीण भागातील चांगले रस्ते बाजारपेठेला जोडले जातात यामुळे उत्पादनाची विक्री करणे सोपे जाते.लोकांना शिक्षण,आरोग्य सेवा व इतर सामाजिक सुविधा मिळण्यासाठी मदत होते. लोक चांगले जिवनमान जगू शकतात.
                 वरील कारणामुळे चांगले व रुंद रस्ते व्हावे यासाठी गोवे येथील शेतकऱ्यांनी विनामूल्य भात शेतीची  जागा रस्त्यासाठी दिली.शिवाय शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला असणारी असंख्य हापूस आंब्याची झाडे तोडण्यात आली. ऐवढेच नव्हे तर चांगल्या रस्त्यासाठी फार्म हाऊस वाल्यांनी ही मोफत जागा दिली.परंतु ठेकेदारांनी मात्र रस्त्याचे काम निस्कृष्ठ दर्जाचे केले असल्यामुळे याचा नाहक त्रास ग्रामस्थांना भोगावा लागणार आहे.कारण महिसदरा नदीच्या बाजुने गेलेला रस्ता पूर्ण पणे खचला आहे.तसेच नदीच्या बाजूचा भराव संरक्षण भिंतीसाठी खोदण्यात आला होता.परंतु त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही यामुळे नदीला खांडी जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकतो.तसेच ठेकेदारांनी मोऱ्यांचे काम ही निस्कृष्ठ दर्जाचे केले आहे.
              

सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदार याला संपूर्ण रस्ता,साईड पट्ट्या,व मोऱ्यांचे काम सुस्थितीत करून देण्याच्या सूचना देण्यात यावा.व हे काम व्यवस्थित पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतीने ठेकेदाराला रस्त्याचे बिल वर्ग करू नये

ग्रामस्थ मंडळ,गोवे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.