Press "Enter" to skip to content

डॉ प्रभाकर गांधी यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे वृद्धापकाळाने निधन

पनवेल दि.4 प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभागी झालेले पनवेल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रभाकर गांधी यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे वृद्धापकाळाने जोगेश्वरी येथील निवासस्थानी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. गांधी यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी मुंबईतील नायर रुग्णालयात त्यांचे देहदान केले.
दत्तात्रय गांधी यांचा जन्म १५ मे १९२३ रोजी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे झाला.

त्यांच्या घरातील सदस्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते ,वडील गोपीनाथ लालाजी गांधी आणि जेष्ठ बंधू शंकर गोपीनाथ गांधी हे दोघेही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते तर दत्तात्रेय गांधी यांचे धाकटे बंधू प्रभाकर गोपीनाथ गांधी हे देखील आणीबाणीत होते. संपूर्ण गांधी कुटुंबीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्यामुळे दत्तात्रय गांधी हे देखील स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले आणि महात्मा गांधींच्या विचारांकडे आकर्षित होऊन कार्य करू लागले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या चले जाव चळवळीत सहभागी झाल्याने त्यांनी दीड वर्ष तुरूंगवास भोगला. त्यांनी पुढे राष्ट्र सेवा दलात काम केले. साने गुरुजींच्या सल्ल्यानंतर शिक्षक म्हणून काम सुरू करीत मुंबईतील छबिलदास शाळेत ३५ वर्षे अध्यापन केले.दरम्यान, गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता गोरेगाव (प.) येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.