Press "Enter" to skip to content

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते बॅडमिंटनपटूंचा सन्मान

राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना  महेंद्रशेठ घरत यांचा मदतीचा हात

उलवे, ता. 3 :  “रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्सला भूखंड मिळवण्यासाठी आणि अत्याधुनिक स्पोर्टस काॅम्प्लेक्स उभारण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी  देशातील-परदेशातील बहुसंख्य स्टेडियमची पाहणी त्यांनी केली. यात माझा खारीचा वाटा आहे. रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्स उभारणी करताना रामशेठ ठाकूर यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. त्यातूनच आजचे भव्यदिव्य रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस काॅम्प्लेक्स साकार झाले आहे. येथे खेळत असलेले खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात, त्यामुळे त्याचा मलाही अभिमान आहे. त्यामुळेच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बॅडमिंटनपटूंना गौरविण्यात येत आहे, ही माझ्यासाठी अत्यानंदाची गोष्ट आहे.” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले. 

महेंद्रशेठ घरत यांनी राष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या बॅडमिंटनपटूंना अडीच लाखांची प्रोत्साहनपर  मदत केली. खेळाडूंना ते नेहमीच मदत करतात. 

योनेक्स-सनराईज रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी घेण्यात आली. रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या बॅडमिंटन स्पर्धेचे प्रायोजकत्व महेंद्रशेठ घरत यांनी स्वीकारले होते.

योनेक्स-सनराईज रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी घेण्यात आली. रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या बॅडमिंटन स्पर्धेचे प्रायोजकत्व महेंद्रशेठ घरत यांनी स्वीकारले होते.
बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा रविवारी रामशेठ ठाकूर काॅम्प्लेक्स येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उद्योजक परेश ठाकूर  उपस्थित होते. त्यांनी महेंद्रशेठ घरत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

बॅडमिंटन आॅर्गनायझेशन आॅफ रायगडचे अध्यक्ष परेश ठाकूर, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र भगत, उपाध्यक्ष शिवा कराईल, सहसचिव प्रशांत मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.