Press "Enter" to skip to content

पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या त्वरीत भुमिगत करा

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची पनवेल महानगरपालिकेकडे मागणी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)-

पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या त्वरीत भुमिगत कराव्यात अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.        

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील विद्युत वाहिन्या भुमिगत व्हाव्यात यासाठी यापूर्वीही अनेकवेळा मागणी केली आहे. परंतु सध्या याची आवश्यकता नाही व ही आपली प्राथमिकता नाही यावर खर्च नको असे कारण सांगून हा विषय अनेक वेळा टाळला गेला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळ व 5 आॅगस्ट रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पनवेलची अवस्था अतिशय दयनीय करून टाकली होती व विद्युत तारा रस्त्यावर अक्षरशः उन्मळून पडल्याचे चित्र दिसून येत आहे. काही भागात 72 तासांपेक्षा जास्त काळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. आपण एकीकडे शहर अद्यावत कऱण्याचा प्रयत्न करीत असताना पनवेल वासियांना पुर्णवेळ विद्युत पुरवठासुद्धा देऊ शकत नाही हे आपल्यासाठी खेदजनक बाब आहे. विद्युत वाहिन्या भुमिगत करणे ही जबाबदारी महापालिका म्हणून आपण स्विकारल्यास पनवेलमधील नागरिकांचे जीवनसुद्धा सुसह्य होऊ शकते. तरी विद्युत वाहिन्या भुमिगत करण्याकडे आपण प्राथमिकता पाहून या विषयावर आपण कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.         

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.