माथेरानकरांना मदतीचा ओघ सुरूच
सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे / माथेरान #
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कर्जत तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी सर्वाधिक मदतीचा हातभार माथेरान मधील नागरिकांना लाभला असून सढळ हाताने मदत करण्यासाठी मुंबई, पुणे तसेच अन्य ठिकाणांहून दानशूर मंडळींचा पुढाकार लाभला आहे. त्यामुळेच माथेरान मध्ये लॉक डाऊन होऊन पाच महिने झाले तरीसुद्धा इथे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उणीव जाणवत नाही.
माथेरान मधील काही राजकीय पक्षांनी सुध्दा आपापल्या दानशूर मित्र मंडळींकडून इथे आजवर भरघोस मदत मिळवुन दिली आहे. यामध्ये घोड्याच्या खाद्यासाठी मोठया प्रमाणावर भूशाचे वाटप करण्यात आले होते. तर अत्यंत गरजवंतासह काही प्रमाणात मध्यमवर्गीय लोकांना सुध्दा जीवनावश्यक वस्तूंचा लाभ प्राप्त झाला आहे.
येथील “डी” ग्रुपचे अध्यक्ष किरण चौधरी,प्रवीण सकपाळ,प्रसाद सावंत,गिरीश पवार,संतोष शिंदे,सचिन दाभेकर,मंगेश सकपाळ यांनी गणेशोत्सव समीप आल्यामुळे मुंबई(चेंबूर ) येथील आमदार प्रकाश फातर्फेकर संस्कार प्रतिष्ठानचे स्वप्नील फातर्फेकर यांना विनंती केल्यावरून तसेच लॉक डाऊन मुळे कुणाच्याही हाताला रोजगार उपलब्ध नाही.
एकंदरीत इथल्या भौगोलिक परिस्थिती बाबतीत कल्पना दिल्यावर जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी आग्रह केला होता. त्यानुसार आमदार प्रकाश फातर्फेकर आणि संस्कार प्रतिष्ठानचे स्वप्नील फातर्फेकर यांच्या माध्यमातून दि.१३ ऑगस्ट रोजी हॉटेल कुमार प्लाझा मध्ये मुबलक प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे किट्स विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
जवळपास चारशे पेक्षाही अधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
यावेळी डी ग्रुपचे अध्यक्ष किरण चौधरी,प्रवीण सकपाळ,प्रसाद सावंत,गिरीश पवार,संतोष शिंदे,सचिन दाभेकर,मंगेश सकपाळ,मिलींद कदम, शैलेश चाफेकर यांनी हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
अशोक शिंदे, वसंत कदम,शैलेश शेलार, महम्मद शेख, महेश,विलास पाटील, प्रदीप घावरे, सूर्यकांत कारंडे,संतोष शिंदे, अरविंद शेलार,नितीन शहा, तुषार सकपाळ,चंद्रकांत दळवी ह्या मंडळीने उपस्थिती दर्शवली.






Be First to Comment