Press "Enter" to skip to content

मुख्याधिकाऱ्यांची शहर विकासावर पत्रकारांशी विशेष चर्चा ! अंबरनाथ पालिकेत पत्रकारांसोबत विशेष बैठकीचे आयोजन

अंबरनाथ प्रतिनीधी : सतिश वि.पाटील

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, त्यामुळे शहराच्या विकासात पत्रकारांची साथ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी केले. शहरातील विकासकामे, समस्या या बाबींवर चर्चा करण्यासाठी आज गायकवाड यांनी अंबरनाथ पालिकेत पत्रकारांसोबत विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील पत्रकारांनी खुलेपणाने आपली मते मांडली.

प्रशासन शहराच्या विकासासाठी सदैव कार्यरत असले, तरी पत्रकारांचा शहरात कायम सर्वत्र वावर असतो. त्यामुळे निश्चितच त्यांच्या माध्यमातून समस्या समोर येत असतात. अंबरनाथ शहरातील पत्रकारांचा शहराच्या विकासातही आजवर मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील अंबरनाथच्या पत्रकारांचे कायमच कौतुक करतात. पत्रकारांच्या या अनुभवातून शहरातील समस्या जाणून घेत जास्तीत जास्त चांगली कामे करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याच्या हेतूने आज मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी पत्रकारांसोबत बैठक आयोजित करत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी पालिकेच्या चांगल्या कामांबद्दल कौतुक करत आवश्यक सुधारणा करण्यासंबंधी सल्लेही दिले. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सर्व पत्रकारांचे मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते. यामध्ये पत्रकार कमलाकर सूर्यवंशी, युसूफ शेख, सीझर लॉरेन्स, श्रीकांत खाडे, पंकज पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील अहिरे, निनाद करमरकर, पांडुरंग रानडे, शत्रुघ्न उमाप, वामन उगले, अजय श्रीनिवास चिरीवेला, तन्वीर शेख, अशोक नाईक, गणेश गायकवाड, नवाज वणू, मुद्दसर अली काजी, प्रफुल्ल केदारे,परेश भानुशाली,अजय शर्मा, शीतल मोरे,दर्शन सोनावणे, मुन्नालाल उपाध्याय आदी पत्रकारांचा समावेश होता. तर प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, नगर अभियंता राजेश तडवी, जनमाहिती अधिकारी किमया पवार, नरेंद्र संख्ये, प्रशांत राणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.