

(प्रतिनिधी कौशिक ठाकुर) उत्तम गुण घ्यावे अवगुण टाळावे या उक्तीप्रमाणे जे जे प्रेरणादायी आहे तेथे आधी करावे आपले वडील कै शिवराम रामा म्हात्रे यांच्या स्मृतिपत्यार्थ गेली अनेक वर्ष आवरे गावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा पार पाडला जातो.
शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षांमध्ये इयत्ता दहावी व बारावी मधील यशवंत किर्तीवंत गुणवंत आणि यशस्वी अशा अशा उरण पूर्व विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कै शिवराम रामा म्हात्रे यांच्या स्मृतिपत्यार्थ आदर्श शिक्षक श्री एम एस म्हात्रे सर हे गेले अनेक वर्ष अशा प्रकारचा उपक्रम हा आवरे गावात आयोजित करत असतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या आई वडील सोबत मायेची शाल सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले समवेत आवरे गावातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने अंबाजी ठाकूर(संगीत कलाक्षेत्र )अनंत पाटील (नाट्य अभिनय) क्षेत्रात म्हणून तर विष्णू गावंड (संगीत गायन)तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये (शिवकुमार गावंड) या विविध मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला आला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा सोहळा या सिद्धेश्वर भोलेनाथाच्या मंदिरात साजरा झाला या कार्यक्रम प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोज गावंड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी भविष्यात उच्च शिक्षणाची खास धरावे तसेच आपल्या आई-वडिलांचे संस्कार हे कदापि विसरून हे व आपल्या यशा त ज्यांचा सिंहाचा वाटचा असतो असे गुरुजन यांच्या अनंत असे उपकार आपल्यावर असतात तसेच कार्यक्रमाचे आयोजक एम एस पात्रे सर यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय परंपरा ही संतांची परंपरा आहे आणि संतांची शिकवण हे काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे याविषयी म्हटलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे प्रभाकर बाळकृष्ण गावंड हे होते तसेच कार्यक्रम प्रसंगी व प्रमुख मान्यवर उच्च शिक्षित श्री मनोज गावंड होते श्री पद्माकर म्हात्रे सर श्री ना .क गावंड गुरुजी कौशिक ठाकूर श्री ज्ञानेश्वर गावंड आवरे गावच्या सरपंच निराबाई पाटील संतोष पाटील श्री गणेश प्रसाद गावंड श्री एच के गावंड व विविध मान्यवर व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरवात ही स्वागतगीत गणेशस्तवन या सुरासोबत संगीत शिक्षक गणेशप्रसाद गावंड सर यांच्या सुमधूर अशा गायनाने कार्यक्रमाची सुरवात झाली सूत्रसंचालन महेश गावंड सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनश्री ज्ञानेश्वर गावंड सर यांनी केले या कार्यक्रमासाठी आवरे गावातील बहुसंख्या नागरिक गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे आई-वडील हे बहुसंख्येने उपस्थित होते अशा प्रकारे आवरे गावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.




Be First to Comment