Press "Enter" to skip to content

दि.8 जून रोजी दादर येथे होणार सत्कार !!

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व वनिता कांबळे यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर

मुंबई (पंकजकुमार पाटील)

गौरव कर्तुत्वाचा, गौरव महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व विक्रोळी मुंबई येथे वास्तव्यास राहून सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे महाराष्ट्र कामगार मंडळाचे गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच वनिता फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रभाकर तुकाराम कांबळे व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महिलांच्या प्रश्नावर अहोरात्र झटणाऱ्या धडाडीच्या समाजसेविका व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ वनिता प्रभाकर कांबळे या उभयतांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ८ जून 25 रोजी दादर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक सुरज भोईर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

स्वराज्य प्रतिष्ठान पुरस्कृत हुतात्मा बाबू गेनू स्मारक समिती यांच्या विशेष सहकार्याने व धडक कामगार युनियन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार वितरण व शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक 8 जून 25 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, 2रा मजला, सुरेंद्र गावस्कर सभागृह, शारदा सिनेमा जवळ, दादर (पूर्व ) मुंबई.14.येथे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व धडक कामगार युनियन चे अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर कांबळे व वनिता कांबळे. या दाम्पत्यास ” महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार* देऊन गौरविण्यात येणार असून त्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून व विभागातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.