Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार


अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष खा .सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश 

उरण ( वार्ताहर)  उरणच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रशांत  पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱयांनी  आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत अजितदादा पवार गटात प्रवेश केला आहे.

यामध्ये प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले मनोजदादा भगत माजी कार्याध्यक्ष रमण कासकर, प्रवक्ते अजित पाटील , भेंडखळ ग्रामपंचायतीचे  विद्यमान सदस्य लिलेश्वर भगत ,तत्कालीन तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर , उरण विधानसभा सरचिटणीस निलेश पाटील, तत्कालीन उरण तालुका ओबीसी सेल तालुकाध्यक्ष  मच्छिंद्र ठाकूर , तालुका सरचिटणीस  नामदेव मढवी ,जासई विभाग अध्यक्ष  दिपक पाटील, संतोष ठाकूर , गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी यावेळी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्या हस्ते घड्याळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करीत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी पक्षाचे विद्यमान तालुका अध्यक्ष परीक्षेत प्रकाश ठाकूर , प्रदेश सरचिटणीस गर्जे , आनंद परांजपे , उरण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य  वैजनाथ ठाकूर आदी उपस्थित होते.      
 

प्रदेश कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात उरणचे सर्व जुने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात आल्याचे समाधान व्यक्त करतानाच या नव्याने पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखण्याबरोबरच उरण तालुक्यावर यापुढील काळात अधिकाधिक लक्ष देण्याचे अभिवचन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले . उरण तालुका हा सर्वाधिक जमीन संपादन झालेला संपूर्ण महाराष्ट्रातील तालुका आहे . या ठिकाणी अनेक प्रकल्प वसले आहेत मात्र त्या नंतरही स्थानिकांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वेळोवेळी बैठका घेऊन येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या सॊबत चर्चा करून धोरणे आखण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. सिडको जे एन पी टी आणि अशा अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील स्थानिक नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे अभिवचन  या निमित्ताने खा. सुनील तटकरे यांनी दिले. प्रवाहाच्या बरोबर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य तो मान सन्मान राखण्याबरोबरच कोणताही दुजाभाव ना करता पक्ष वाढीचे प्रयत्न इथून पुढच्या काळात जोमाने करण्याचे अभिवचन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मूळ राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांचा भविष्य काळात देखील अजित पवार यांच्या गटात लवकरच प्रवेश होणार असल्याचे या निमित्ताने जाहीर करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.