सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे उपजिल्हा रूग्णालयातील स्टाफ व रूग्णांसाठी तालुक्यातील वरसे-धाटाव जि.प.गट राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते यांच्याकडून डिससपोजल ग्वाऊनिंगची भेट देण्यात आली आहे.
कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेली महिनाभर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक संघटनेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात जात आहेत तर कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातन लोकनेते खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक विभागवारी सामाजिक उपक्रम राबविले आले.
त्याचाच एक भाग म्हणून वरसे-धाटाव जि.प.गट राष्ट्रवादी युवक
काँग्रेसच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून उपजिल्हा रूगणालय-रोहा येथे दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता रूगणालयातील स्टाफ व रूग्णांनसाठी डिसपोजल गाऊनींग देण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रूगणालय-रोहा अधिक्षक डॉ.अंकिता मते व त्यांचे सहकारी तसेच.रामचंद्र म्हात्रे,नरेश पाटील,उपसरपंच अमित मोहिते,जयवंत मुंढे,राम नाकती,महेश बामुगडे,उत्तम मोरे,मंगेश देवकर,शंतनु रटाटे,रूपेश बामुगडे,संजय बामुगडे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment