Press "Enter" to skip to content

मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिमेष ओझेसह पदाधिकारी भाजपात 

पनवेल (प्रतिनिधी)  पनवेल महानगरातील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मार्केट यार्ड मध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते स्वागत प्रवेश देण्यात आला. 

       यावेळी माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेविका प्रिती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, पनवेल मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, सरचिटणीस अमित ओझे, केदार भगत, रुपेश नागवेकर, महिला मोर्चा अध्यक्षा रुचिता लोंढे-समेळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

          मनसे विद्यार्थी सेनेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिमेष अमित ओझे, पनवेल शहर अध्यक्ष केदार रेवाळे, प्रभाग १७ अध्यक्ष ऋषिकेश सावंत, तालुका सचिव आकाश गाडे, प्रभाग १९ अध्यक्ष अभि रिंगे, आकाश दलाल, हिमांशु पाटील, पराग भातणकर, प्रणय मोहिते, तन्मय मोरे, सौरभ रामधरणे, रुद्र पाटील, प्रभंजन गाडगीळ, प्रथम दासरी, प्रथम ठाकरे, प्रसाद धवळे, मृण्मय पाटील, शिवराज बोबडे हर्षद घाटे, आशुतोष पाटील, रोहित धामणस्कर, हर्ष जेटवा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.