Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आचल दलाल यांनी स्वीकारला पदभार

रायगड : याकूब सय्यद

रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या जागी पुणे पोलीस बल क्रमांक गट (१) एक मध्ये अहिल्यानगर येथील कार्यरत असलेल्या आचल दलाल यांची रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगर येथे झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेहा भोसले तर पोलीस अधीक्षक पदी आचल दलाल या दोन महिला रायगड जिल्ह्याचे सूत्र यापुढे सांभाळणार आहेत.

आचल दलाल यांनी सातारा येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे तर पुणे येथे समादेशक राज्य राखीव पोलीस बल क्रमांक गट (१) एक कार्यरत होत्या. आचल दलाल हे उत्तर प्रदेश गाजियाबाद जिल्ह्यामधील शामली येथील असून पोलीस दलात येण्यापूर्वी ते नागपूर रेल्वे विभागात होत्या. आचल दलाल ह्या सन २०१८ मध्ये १३६ व्या रँक मिळून आयपीएस आय झाल्या होत्या. त्यांनी लेडी आऊटडोर प्रोबेलेशन १९५८ बॅच आयपीएस ट्रॉफी जिंकली आहे. साताऱ्यात अप्पर पोलीस अधीक्षक पदी असताना जुगारावर धडक कारवाई केल्या होत्या, महाविद्यालया परिसरात छेडछाड प्रकार आटोक्यात आणले होते.

आचल दलाल यांची कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असल्याने रायगड जिल्ह्यामध्ये त्यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात योग्य अशी कामगिरी करतील अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे. शालेय जीवनामध्ये क्रीडा क्षेत्राची आवड आहे. बास्केटबॉल बॅटमिंटन मध्ये त्यांनी कौशल्य प्राप्त केले आहे. आयपीएस शिक्षणामध्ये लांब पल्ल्याची पोहण्याची स्पर्धा देखील त्यांनी पार पाडली आहे. उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच इतर स्पर्धेमध्ये त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुंडी यांचे त्या पत्नी आहेत. आचल दलाल यांचा कुटुंब उत्तर प्रदेश गाजियाबाद मध्ये राहत आहे. त्यांचे वडील दूरसंचार निगम मध्ये जीएम पदी कार्यरत होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलीस दलातील २२ पोलीस अधीक्षक आणि पोलीस उप आयुक्तांच्या २२/०५/२०२५ रोजी बदल्या केल्या आहेत. बदल्या मुळे रायगड जिल्ह्याला दोन आयपीएस महिला अधिकारी लाभले आहेत रायगड जिल्ह्यात प्रथमच महिला अधिकारी म्हणून आचल दलाल यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर कायदा सुव्यवस्थाची तसेच पोलीस प्रशासनाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.