
तृप्ती भोईर : उरण
दिनांक २२ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे उरण -नेरूळ -बेलापूर लोकल विषयी समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले .या निवेदनानुसार नवी मुंबई उरण- नेरूळ -बेलापूर लोकल एक तासा ऐवजी प्रत्येक १५ मिनिटाला सुरु करणे, उरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल ताबडतोब सुरू करणे, त्याचप्रमाणे प्रवाशांना कामाच्या ठिकाणी व इतर महत्त्वाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी सकाळी लवकर ४.३० आणि रात्री उशिरा १२ वाजेपर्यंतलोकल सेवा उपलब्ध करणे, हे मुख्य विषय या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
वरील निवेदन दिनांक २२ मे रोजी उरण नेरूळ बेलापूर प्रवाशांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी डॉ.नितीन दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री अतिथी गृह येथे नवी मुंबईतील सिडको आणि महापालिका यांच्या संदर्भातील विविध विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय कारणास्तव उपमुख्यमंत्री सदरच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू न शकल्याने ,व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब सभेस येऊ न शकल्यामुळे आरोग्य मंत्री माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग संपन्न झाली .
सदरच्या बैठकीत उरण नेरूळ बेलापूर प्रवाशांच्या निवेदनाची पूर्तता करण्यात येणार आहे, असे आश्वासन देण्यात आले आहे. यानुसार उरण नेरूळ बेलापूर लोकलच्या फेऱ्या वाढणार, नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांचे सिडकोच्या माध्यमातून लवकरच सुविधा व दुरुस्तीचे काम होणार, तसेच खासदार माननीय नरेंद्र म्हस्के साहेबांनी नेरूळ बेलापूर उरण लोकल प्रत्येक १५ मिनिटाला करण्याचे व उरण सीएसटी लोकल, उरण ठाणे लोकल, उरण पनवेल लोकल ताबडतोब चालू करण्याचे हजारो प्रवासांची मागणी लक्षात घेऊन हे निवेदन स्वीकारून २५ मे रोजी रेल्वेमंत्री माननीय वैष्णव साहेबांबरोबर मीटिंग घेऊन वरील मागण्या मान्य करून घेण्याचे व लोकल फेऱ्या वाढवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
नेरूळ बेलापूर प्रवासी संघटनेच्या वतीने डॉक्टर नितीन दिघे साहेब यांनी या कामासाठी विशेष मेहनत घेतली.
हजारो उरण नेरूळ बेलापूर प्रवाशांच्या वतीने खासदार माननीय नरेंद्र मस्के साहेबांचे आभार मानण्यात आले.




Be First to Comment