
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने प्रदेश चिटणीस सुनिल गोगटे यांच्या नेतृत्वाखाली बॅंक ऑफ इंडिया कर्जत शाखेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कोरोना सारख्या महासंकट समयी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दुधाला योग्य दर नाही, निसर्ग वादळाने घरांची पडझड झाली याने शेतकरी खचून गेला आहे. अश्या वेळी बॅंकाकडून कर्ज सुद्धा दिले जात नाही त्यासाठी भाजप किसान मोर्चाने पुढाकार घेऊन ठिय्या आंदोलन करून शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज द्यावे सात बारा आणि 8अ आणि आधार कार्ड एवढेच कागदपत्रे घेऊन कर्ज द्यावे किसान क्रेडीट कार्ड द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल इशारा आणि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रसंगी जेष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामीनी मांजरे, महिला तालुकाध्यक्ष स्नेहा गोगटे, गायत्री परांजपे, मंदार मेहेंदळे, रमाकांत जाधव, रवी जाधव, दिनेश भरकले, धनंजय थोरवे, विनायक पवार, संजय ठाणगे, मिलिंद खंडागळे आदी कायकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment