Press "Enter" to skip to content

खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी देविदास म्हात्रे

उलवे, ता. २२ : खालापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी देविदास पंढरीनाथ म्हात्रे यांची नियुक्ती सर्वानुमते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी केली. त्यांचे वडील पंढरीनाथ म्हात्रे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. बॅरिस्टर अ. र. अंतुले यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्याची दखल घेऊन १९८० मध्ये खालापूरच्या अध्यक्षपदी निवड केली होती.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “निष्ठावंतांना आणि तरुणांना काँग्रेसमध्ये पदांचे वाटप करताना अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, काँग्रेसमध्ये जो मानसन्मान मिळेल तो तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षात मिळणार नाही, त्यामुळे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत राहा, दिवस आपलेच आहेत.
 

खालापूरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोक्याच्या जागेवर कार्यालय उघडावे. तेथे नागरिकांच्या समस्या ऐकून घ्या, त्यांना धीर आणि आधार द्या. काँग्रेसची भूमिका पटवून सांगा, मी तुमच्या पाठीमागे आहेच.”

महेंद्रशेठ घरत यांनी देविदास म्हात्रे यांचे तालुकाध्यक्ष नियुक्तीचे पत्र दिल्यानंतर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. 
यावेळी रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवळे, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी विनायक देशमुख, राम कुरंगळे, संजय कुरंगळे, अजय मस्कर, विकास पारंगे, केडी म्हात्रे, नितीन म्हात्रे, विनायक डवळे, गोपाळ सुरवसे, संजय गुप्ता, मंगेश डवळे, शैलेश कुरंगळे कुणाल जाधव,अमित म्हात्रे, समाधान म्हात्रे, प्रमोद कोंडिलकर, संतोष कुरंगळे, अमेय कुरंगळे, अतुल कुरंगळे , सागर कुरंगळे, प्रदीप कुरंगळे, नरेश म्हात्रे, स्वप्निल डवळे, भूषण म्हात्रे नितेश डवळे, निहार म्हात्रे, कौशल म्हात्रे, विनीत डवळे आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.