Press "Enter" to skip to content

भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पनवेलमध्ये तिरंगा यात्रा

पनवेल शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑपरेशन सिंदूर’ मधील वीरांना विनम्र अभिवादन देण्यासाठी “तिरंगा यात्रा”चे आयोजन करण्यात आले. त्यानंतर देशाचे माजी पंतप्रधान आणि संगणक युगाचे प्रणेते राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेस भवन पनवेल येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या यात्रेमध्ये पनवेल जिल्हा काँग्रेसचे प्रभारी हुस्नबानु खलीपे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी,समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक,  यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.