Press "Enter" to skip to content

शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलात विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा


ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स या कनिष्ठ महाविद्यालयाचा फेब्रुवारी 2025 चा 12 वी परीक्षेचा कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांचा निकाल 100 % लागला. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभ संस्थेचे विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला

कला शाखेत संस्कृती धनंजय वर्तक 76 % , विज्ञान शाखेत गौरव साईनाथ गावंड 73.50% व वाणिज्य शाखेत मितेश मारुती म्हात्रे 67.50% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिन्ही शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व ज्येष्ठ साहित्यिक ए.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न, समवेत आई-वडील व गुरुजनांचा आदर करणे व सुसंस्कारीत जीवन जगण्याचा कानमंत्र दिला. तसेच सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक निरीक्षक प्रकाश पाटील यांनी आत्मविश्वास, शिस्त व त्याग याचे जीवनातील महत्त्व विशद करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश उपस्थिताना दिला. याप्रसंगी संस्थेच्या खजिनदार प्राचार्य डॉ. सुखदा म्हात्रे यांनी जीवनात ध्येय संपादन करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्राप्त करावे व स्वतः बरोबर समाजाचा गौरव वाढवावा असे प्रतिपादन केले.

संस्थेचे विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी अध्यक्षीय भाषणात बारावी परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून इयत्ता बारावी नंतर कोणत्या सेवा संधी आहेत, त्या संदर्भात अभ्यासक्रम कोणते आहेत, याची माहिती दिली. ज्ञान प्रसार शिक्षण संस्थेने उरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठीय उच्च शिक्षण सोयीचे व्हावे यासाठी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये सुरू केलेल्या शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयातील कला, विज्ञान, वाणिज्य, तंत्रज्ञान या शाखांतील अभ्यासक्रमाची माहिती विशद केली. तसेच मुंबई विद्यापीठाची पदवी प्रक्रिया व नियमावली याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात शिक्षण करिता प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे आर्टस सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयामध्ये केलेल्या कार्याचा गौरव केला. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 या कालावधीत प्रथम व द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमासंबंधी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त मेघा म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुविद्य गावंड, सुयश म्हात्रे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. शिवहरी गावंड यांनी सूत्रसंचालन केले व श्री. विलास काटे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.