Press "Enter" to skip to content

ध्वजावर कल्पवृक्ष आणि कामधेनू यांची प्रतिमा !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला

 फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) - सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ऐतिहासिक घटना घडली. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभहस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण शंखनाद आणि वेदमंत्रांच्या गजरात करण्यात आले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमले.

 ‘सनातन धर्माचा ध्वजा’चे वैशिष्ट्य : प्रत्येक मंदिरात जशी ध्वजस्थापना होते, तसे सनातन राष्ट्राशी संबंधित ‘सनातन धर्मध्वजा’चे आरोहण करण्यात आले. हा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. हा ‘धर्मध्वज’ आहे. ‘सनातन हिंदु राष्ट्राची स्थापना’ या ध्येयाची विश्वाच्या कानाकोपर्‍यात असलेल्या हिंदूंना हा ध्वज जाणीव करून देईल. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरुढ झाले होते, त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता, तो सनातन धर्माचा ध्वज होता. हनुमंताचा रंग शेंदरी म्हणजे केशरी आहे; म्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहे. या ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’, असे चित्र आहे. कल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धी, पालन-पोषण, संरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’ यांची प्रतिके आहेत.
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.