
जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700 हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग !
दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे आणि आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांची यज्ञाला उपस्थिती
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – भारतात ‘रामराज्य’ हे केवळ एक धार्मिक आदर्श नव्हे, तर संस्कृती, नीती, आणि न्यायाधिष्ठित शासन व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते. या महान उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा गोवा येथे आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात करण्यात आला. ‘देशविदेशातून आलेल्या २५ सहस्रपेक्षा अधिक भाविकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप केला. या जपयज्ञामुळे संपूर्ण वातावरण राममय झाले होते.
जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700 साधक, धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग !
या जपयज्ञाचा उद्देश म्हणजे राष्ट्राला अध्यात्मिक उर्जा देणे, नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणे आणि सनातन हिंदू संस्कृतीचा जागर घडवणे. या यज्ञात देशभरातील साधक, भक्त, धर्मप्रेमी आणि विविध धार्मिक संस्था सहभागी झाल्या. या जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700 साधक, धर्मप्रेमी हिंदूंनी सहभाग घेतला. दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन तथा प्रदेश संयोजक व भाजपा महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रकोष्ठ श्री. धनराज विसपुते यांची उपस्थिती जपयज्ञाला लाभली.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक पर्वणी नसून आपल्या सनातन संस्कृतीच्या अमरत्वाची, तेजस्वी परंपरेची आणि जागृत आत्मबळाची एक स्फूर्तिदायक जाणीव आहे. या महोत्सवात प्राचीन शास्त्र, अध्यात्म, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कृती यांचा संगम अनुभवता आला. ज्या प्रकारे विचारवंत, साधक, आणि राष्ट्रप्रेमी एकत्र आले आहेत, ते पाहून असे वाटते की नवसंस्कारित भारताचा उदय याच वैचारिक क्रांतीतून घडतो आहे, असे मत श्री. धनराज विसपुते यांनी मांडले.
पू. प्रमोद केणे यावेळी म्हणाले, ‘हिंदूंनी एकत्र येणे ही महत्वाची गोष्ट आहे. सर्व हिंदूंनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन देशहित आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्मासाठी त्याग करणारे धर्माची सेवा करणारे यांची सत्कार म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सोहळा अभूतपूर्व सोहळा आहे.




Be First to Comment