भाईनाथ महाराजांच्या वतीने आदीवासी वस्तीवर धान्यवाटप
श्रीनिवास काजरेकर
पनवेल दि. 12
साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था ,खोपोली मठाधिपती योगी भाईनाथ महाराज यांच्या वतीने शिरवली ग्रामपंचायत अंतर्गत भल्ल्याची वाडी येथील दुर्गम आदिवासी वस्तीमधे अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. कोरोना महामारीमुळे या दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना बेरोजगारीचा मोट्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. पत्रकार मयूर तांबडे यांनी या परिस्थितीची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महंत योगी भाईनाथ महाराज यांनी आपल्या सेवेकऱ्यांसह या वस्तीला भेट देवून पंधरा दिवस पुरेल अेवढ्या अन्नधान्याचे वितरण केले. तांदूळ, डाळ, आटा, कडधान्य, मसाले, मीठ, दंतमंजन अशा प्रकारच्या वस्तूंचा यात सामावेश आहे.
या कार्यामधे पत्रकार मयूर तांबडे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण भगत, यांच्यासह संतोष पाटील, सुशांत चाळके, समीर पोटे, मनोज नागपाल, दिलिप दुबे या सेवेकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
मठ मंदिरे ही केवळ आध्यात्मापुरतीच मर्यादित न राहता सामाजिक कार्याची केंद्र बनावी. मनुष्याप्राण्यामधेही असलेल्या ईश्वरी अस्तित्वाची जाणीव ठेवून आपली मदत योग्य अशा गरजू व गरीबांपर्यंत पोहोचवणे हेसुद्धा खरे धर्मपालन आहे.
महंत योगी भाईनाथ महाराज,
साईनाथ दरबार, खोपोली







Be First to Comment