Press "Enter" to skip to content

पोलीस महासंचालक पोलीस पदक पोलीस हवालदार धिरज थवई यांना मिळाल्याबद्दल करण्यात आला विशेष सत्कार


पनवेल, दि.9 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सायबर विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार धिरज नारायण थवई यांना नुकताच पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक पोलीस पदक त्यांना नुकतेच मिळाल्याबद्दल पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार आज वपोनि नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

पोलीस हवालदार धिरज थवई यांनी आतापर्यंत पोलीस खात्यात असताना विविध विभागात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून त्यांना पोलीस महासंचालक पोलीस पदक बहाल करण्यात आले. याबद्दल आज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.