Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यात कोरोनाचे आज २३ नवीन रुग्ण

रोह्यात बाधित रुग्णांची संख्या पोहोचली ८५८ वर

सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)

रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आज ११ ऑगस्ट रोजी पुन्हा तालुक्यात कोरोनाचे २३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ८५८ वर पोहोचली आहे.

आज आढळून आलेल्या नवीन २३ रुग्णांमध्ये भुवनेश्वर १,नागोठणे ३, मेढा १, परमार नगर वरसे १,यश रेसिडसी बिल्डिंग १, खैरेवाडी धाटाव १, रोठ्खुर्ड्ड १,तलाघर १, दत्तात्रेय निवास ३,दत्तकृपा अपार्टमेंट ३,माऊली सदन धनगर अाळी ३,अष्टमी कोळी वाडा १,मराठा आळी नागोठणे १,कडसुरे १ व गांगल चौक रोहा १ या सर्वांची कोरोना टेस्ट आज पॉझिटीव्ह आली आहे.

दरम्यान, आज आढळून आलेल्या २३ नवीन रुग्णांमुळे रोहा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५८ वर पोहोचली आहे.सध्या २६२ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात १९ जण मयत झाले आहेत.तर ५७७ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.तरी घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.