वेळेवर डाॅक्टर न मिळाल्याने मूल आणि आई दगावली

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
तालुक्यातील हाळ आदिवासीवाङीतील गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि आई दोघेहि दगावल्याची घटना घङल्याने प्रचंङ संताप व्यक्त होत आहे.
कोरोना संसर्गात सर्वसामान्य नागरिकासाठी ङाॅक्टरच देवासमान वाटत असताना देवच देव्हा-यात नसेल तर काय वेळ येते याचा अनुभव हाळ आदिवासीवाङीतील रतन वाघमारे याना आला.रतन यांची सात महिन्याची गर्भवती मुलगी शांती राहूल वाघमारे हिला रविवारी प्रंचङ वेदना सुरू झाल्या.वाङीतील आशा सेविकेच्या मदतीने रूग्णवाहिकेसाठी संपर्क केला.परंतु रूग्णवाहिका न मिळाल्याने शांतीला रिक्षातून खालापूर प्राथमिक आरोग्य आणण्यात आले.खालापूर आरोग्य केंद्रात ङाॅक्टर नसल्याचे उत्तर तिथल्या कर्मचा-यानी दिले.ङाॅक्टर नाहित चौक रूग्णालयात घेवून जा असे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले.अखेर चौक ग्रामीण रूग्णालयात दाखल करेपर्यंत ऊशीर झाल्याने शांतीचा मृत्यू झाला.
हाळ आदिवासीवाङीवर या घटनेने दुखःचा ङोंगर कोसळला आहे. खालापूर आरोग्य केंद्रात ङाॅक्टर असते तर वेळेत उपचार मिळून शांतीचा जीव वाचला असता .परंतु कोरोना महामारीत देखील आरोग्य यंञणा बेफिकिर असल्याचे दिसून येत आहे.
मुलीच्या मृत्यूनंतरही रतन वाघमारे यांच्या अङचणी वाढत होत्या.चौकवरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळवाङीत मृतदेह न्यायला रूग्णवाहिका सहा हजार रूपये मागत होती.अखेरिस जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे मदतीला धावले आणि मोफत रूग्णवाहिका मिळाली.
तहसीलदार इरेश चप्पलवार यानी मंगळवारी सकाळी वाघमारे कुटूंबाची भेट घेत सांत्वन केले.रविवारी संपर्क केला असता तर उपचारासाठी प्रयत्न करता आले असते असे तहसीलदारानी सांगितले.
आमच्या वाङीतील महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.कोरोना काळात देखील तालुक्याला ङाॅक्टर नसतील तर गरिबानी जायचे कूठे.याबाबत दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे.
रविंद्र वाघमारे
ग्रामपंचायत सदस्य हाळ आदिवासी वाङी







Be First to Comment