Press "Enter" to skip to content

ॲट्रॉसिटी अंतर्गत आरोपीस अटक

हमरापूर सरपंच राकेश दाभाडे याच्या कडून महिलेवर अत्याचार

पेण, ता. २२ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे यांनी एका महिलेवर पंधरा वर्षे अत्याचार केल्या प्रकरणी असाह्य झालेल्या फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पेण पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे याने सन २०१० मध्ये फिर्यादी महिलेशी प्रेमाचे नाटक करुन तीच्यावर अनेकदा शारीरिक संबंध ठेवले यामध्ये फिर्यादी ती खालच्या जातीची म्हणजेच बुरूड समाजाची असल्याने लग्नास नकार देवून फिर्यादी हिचे स्वतःचे मोबाईलमध्ये काढलेले अश्लिल फोटो याचा फायदा घेत फिर्यादीस भेटण्यास बोलावून तीने नकार दिल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीच्यावर झी गार्डन हॉटेल, कोंबडपाडा, रामवाडी युनायटेड बिल्डींग येथे बोलावून दि. १२/०४/२०२५ पर्यंत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले असल्याने याबाबत फिर्यादीने आरोपी याची पत्नी अक्षता दाभाडे हिस याबाबतची सर्व हकिगत सांगण्याकरीता दि. १६/०४/२०२५ रोजी हमरापूर येथे गेली असता आरोपी सरपंच यांच्या पत्नीने फिर्यादीला तू खालच्या जातीची आहेस तुला काय करायचे आहे ते कर असे बोलल्यानंतर फिर्यादी हिने राकेश दाभाडे यांच्या पत्नींला शांतपणे बोलण्याबाबत सांगितले तेव्हा सरपंच म्हणाला की माझ्या पत्नीशी नीट बोल व तू जे करणार आहे ते कर तुम्ही सर्व खालच्या जातीचे आहात असे जातीवाचक बोलून तीला अपमानीत केले.

त्यामुळे फिर्यादीने पेण पोलिस ठाण्यात भा.न्या.स.कलम ६४,६४(२),(एम),३५१(२),३(५), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम (३)(आर),३(१) (एस) ३ (१) (डब्ल्यू) (i) (ii) नुसार ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या माध्यमातून पोलिस करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.