Press "Enter" to skip to content

चांदेपट्टी गावात हनुमान जन्मोत्सव उत्सवात साजरा

पेण, ता. 19 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील डोंगरदऱ्यामध्ये असणाऱ्या चांदीपट्टी गावात दि.११ रोजी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण नुसार हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सकाळीची काकड आरती, नित्यपाठ, ज्ञानेश्वरी पूजन, कलश पूजन, ध्वज पूजन, व्यासपीठ पूजन, विनापूजन व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायण, प्रवचन व दीपोत्सव ह.भ.प श्री नरेश महाराज जाधव व ह.भ.प.पांडुरंग महाराज दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.तसेच रात्री भागवताचार्य ह.भ.प हर्षाला ताई मगर (टिटवाला) यांच्या कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते.तसेच दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सव, अभिषेक, सत्यनारायणाची महापूजा व ह.भ.प श्री ज्ञानेश्वर महाराज पाटील ( खानाव) यांचे काल्याचे कीर्तन झाले.यादरम्यान प्रभू श्री रामदूत हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा संपूर्ण गावामध्ये काढण्यात आला.या हनुमान जयंती उत्सवानिमित्त गावामध्ये असंख्य हनुमान भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.