Press "Enter" to skip to content

सिद्धेश्वर मंदिर आवरे येथे साध्या पध्दतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

सिटी बेल लाइव्ह / आवरे (प्रतिनिधी)

कोरोना चा वाढत असलेल्या प्रभाव आणि त्याचा मानवी जीवनावर होत चाललेला विपरीत परिणाम लक्षात घेता सामजिक अंतर चे सर्व नियम पाळून तसेच शासनाने रुजू केलेल्या नियमांची अंमलबजावणी करत श्रीकृष्ण जन्मष्टमी हा पारंपरिक जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यासाठी आवरे ग्रामस्थ व गावकमिटी यांनी पारंपरिक चाललेली अखंड हरिनाम साप्ताह ही सात दिवस चालणारी परंपरा ही पहिल्यानंदा खंडित करीत फक्त कॉरोना प्रादुर्भाव मुलं शेवटच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी सकाळी प्रारंभी आरती करून सकाळ पासून सदर साप्ताह फक्त 4 प्रहार( पारा) ठेवून म्हणजे भक्ती मय वातावरण सामाजिक अंतर ठेवून रात्री 12 वाजता श्रींची आरती व श्रींचा जन्मसोहळा पाळणा हा गुण्यागोविंदाने साजरा केलं व सकाळी गोपाळकाळा च्या दिवशी सकाळी सिद्धेश्वर मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून श्रींची पालकी ही देवळात मनोभावे आणली.

जन्माष्टमी सोहळा पारपाड ण्यात आला दरवर्षी हा सोहळा आणि शिवमंदिरात साजरे होणारे सर्व महोत्सव हे मोठ्या जळोष्यात साजरे होत असतात तसेच आवरे गावातील सर्व दहीहंडी रद्द करून श्रीकृष्ण जन्मसोहळा प्रसंगी देवळातील दहीहंडी बालगोपालांनी दोन थर रचून तोडली आणि श्रीकृष्ण जन्मसोहळा अतिशय साध्या अश्या पद्धतीने सिद्धेश्वर मंदिर आवरे येथे साध्य पध्दतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.