

मोदी शासनाच्या द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने केलेल्या ED कार्यालयाने National Herold ची सम्पत्ति जप्त करून श्रीमती सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या विरोधात ई. डी.कार्यालयाने कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे तसेच भाजपा सरकारने सन २०१४ ते आतापर्यंत केंद्रातील भाजपा सरकारने ज्या केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग करून भाजपाच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे त्याचा निषेध पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन पनवेल येथे करण्यात आला.

तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग थांबविणेबाबत प्रांत ऑफिस कार्यालय पनवेल येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महिला निरीक्षक चंद्रकला नायडू, कार्याध्यक्ष शशिकला सिंह,अरविंद सोनटक्के, पनवेल शहर युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, तालुका अध्यक्ष नंदराज मुंगजी, जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे,शशिकांत बांदोडकर ,वैभव पाटील, जनार्दन पाटील, लतीफ शेख, नौफील सय्यद, बबन केणी, कांतीभाई गंगर,विश्वनाथ મતે, सुधीर मोरे,जनार्दन पाटील ,विश्वजित पाटील, राकेश चव्हाण,बाळकृष्ण घरत, आदम ढलाईत,हरपिंदर वीर सिंग, जयवंत देशमुख, मनोज बिरादार, डॉ. स्वप्नील पवार, , अरुण कुंभार, जोस जेम्स, नीता शेनोय व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




Be First to Comment