शेकापचे रमाकांत म्हात्रे यांचे महसूलमंत्री थोरात यांना साकडे
सिटी बेल लाइव्ह / उरण (प्रतिनिधी)
उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या कारकिर्दीत उरणकरांचे भवितव्य अंधकारमय दिसत असल्याने त्यांची तातडीने उरण येथून बदली करून कार्यक्षम तहसीलदारांची नियुक्ती करण्याची मागणी करत शेतकरी कामगार पुरोगामी युवक संघटनेचे उरण अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाच थेट साकडे घातले आहे.
यापूर्वी उरण मधील काही समाजसेवकांनी व पत्रकारांनी तसेच नुकतीच जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे हे उरणच्या जनतेला सहकार्य करीत नसल्याने त्यांच्या विरोधात असंतोष पसरला आहे. १ ऑगस्ट पासून पावसाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने अनेक गावातील घरांना पाणी घुसले होते. याबाबत तहसीलदार अंधारे यांना फोन केला असता त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर जासई तलाठी पवार यांना याची फोन करून कल्पना दिली असता उद्या येतो असे सांगितले. पवार यांनी येऊन पंचनामे सुरू केले असता काही वेळाने त्यांना फोन द्वारे तहसीलदारांनी पंचनामे करू नको असे त्यांना सांगितले.
याबाबत तहसीलदार अंधारे यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेलो असता ते एकूण घेण्याऐवजी तुमच्या घरात २ फुटांपेक्षा जास्त पाणी आले होते का ? तसेच हे पाणी ४८ तास घरात राहिले होते का ? असे सवाल केले. त्यावेळी रमाकांत म्हात्रे यांनी गेल्यावर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पंचनामे करून त्वरित भरपाई मिळाली होती. हे निदर्शनास आणूनही मला आणखीन बरीच कामे आहेत तुम्ही या असे उत्तर दिले. या आडमुठ्या धोरणामुळे पंचनामे अर्धवट राहिले आहेत.
लॉक डाऊनच्या काळात रेशनिंग दुकानदार व्यवस्थित धान्य वाटप करीत नसून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तालुक्यातून तक्रारी विशेषता तक्रारी केल्या तसेच वृत्तपत्रा बातम्या प्रसिद्ध होऊन ही रेशनिंग दुकानदारांना व त्याचा कारभार पहाणाऱ्या अधिकारी वर्गाला पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. तर करंजा गावात कोरोना कोविड १९ चा जो मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला या सर्वांना तहसीलदारच जबाबदार असल्याचा आरोप रमाकांत म्हात्रे यांनी करीत अशा अकार्यक्षम तहसीलदारांची बदली करून त्याठिकाणी कार्यक्षम तहसीलदारांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या पत्राची प्रत पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील आदींना दिल्या आहेत. याबाबत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.
उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या विरोधात उरणमधील समाजसेवक, पत्रकार व जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांनी यापूर्वी लेखी तक्रार करूनही वरिष्ठांकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. आता रमाकांत म्हात्रे यांच्या मागणीवर कारवाई होते की नाही याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.






Be First to Comment