Press "Enter" to skip to content

पोलादपूर तालुक्यात कोरोनामृतांची संख्या 11

कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या झाली 99

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-

तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या मंदावली असून मंगळवारी आणि बुधवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कोरोनामृत्यूची संख्या 11 झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे यांनी दिली. दरम्यान, दोन जणांची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने एकूण कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 99 झाली आहे.

सोमवारी पोलादपूर शहरातील जयहनुमानगर येथील एक महिला, एका पोलीसाची तसेच क्षेत्रपाळ येथील एका व्यक्तीची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर तालुका कृषी कार्यालयामधील दोन कर्मचाऱ्यांची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर एकूण कोरोना रूग्णांची संख्या 99 झाली असून मंगळवारी पोलादपूर सैनिकनगर भागातील चांदबिबी नावाची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह महिला 8 ऑगस्टला अलिबाग आणि तेथून ठाणे येथे उपचारासाठी नेण्यात आली असता मृत झाली आणि बुधवारी काटेतळी येथील कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह परशूराम मोरे गेल्या महिन्यापासून ठाणे येथील एकता हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या उपचारादरम्यान मृत झाला. सध्या 11 पॉझिटीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत.

यापूर्वी पोलादपूर जोगेश्वरी गाडीतळ, सडवली, पोलादपूर शहरातील मठगल्ली, चरई, तुर्भे बुद्रूक, देवपूर, पोलादपूर प्रभातनगर, काटेतळी आणि माटवण येथील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी पोलादपूर तालुक्यातील एकूण 99 रूग्ण संख्येपैकी 11 मृत्यू आणि 11 रूग्ण उपचार घेत असून 80 टक्के म्हणजेच 77 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.