सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनची नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारणीची निवड एकमताने करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विकास मोरे यांची निवड करण्यात आली. सदर कमिटी पुढील 2 वर्षांसाठी असणार आहे. नवनिर्वाचित कमिटीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्षपदी डॉ. विकास मोरे, सचिवपदी डॉ. सत्या ठाकरे, खजिनदारपदी डॉ. हरिओम म्हात्रे, सांस्कृतिक सचिवपदी डॉ. प्रशांत बोंद्रे, क्रीडा सचिवपदी डॉ. सूरज मढवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला असोसिएशनचे सर्व सभासद व असोसिएशनचे पेट्रॉन डॉ. दहिफळे, डॉ. सुरेश पाटील, डॉ. मंगेश डाके आदी उपस्थित होते.
माजी अध्यक्ष डॉ. संजीव म्हात्रे यांच्या हस्ते नवनिर्वाचित कमिटीचे स्वागत करून पदभार सोपविला.






Be First to Comment