उरणमध्ये आज सापडले उरणमध्ये १४ पॉझिटीव्ह
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १४ जण सापडले आहेत. तर २ जणांना घरी सोडण्यात आले असून ४ जण मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १०३९, उपचार करून बरे झालेले ८४७, उपचार घेणारे १४८, मयत ४४ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज वेश्वि १, दिघोडे १, फुंडे १, जासई १, चिन्मय सोसायटी उरण १, जेएनपीटी टाऊनशिप १, वशेणी १, पोलीस स्टेशन उरण १, काठे आळी केगाव आवेडा १, आवरे १, नागाव १, म्हातवली १, कुंभारवाडा १, नागाव १ असे एकूण १४ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर जेएनपीटी सेकटर ३ मधील २ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर कळंबुसरे १, धुतुम १, दिघोडे १ व नागाव १ असे एकूण ४ जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये पॉझिटीव्हचा आकडा वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. आजपर्यंत कोरोनाने ४४ जणांना मृत्यूने गाठले आहे. यामुळे उरणकरांनी आता योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.






Be First to Comment