Press "Enter" to skip to content

नागोठणे पोलिस ठाण्यातील दोन कर्मचार्‍यांची कोरोनावर मात

कामावर रूजू झाल्यावर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केले जोरदार स्वागत

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

कोरोना काळात आपली सेवा बजावत असतांनाच कोरोनाची लागण झालेले नागोठणे पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार व वाहनचालक मनोहर महाले व पोलिस नाईक जयेंद्र पाटील यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

नागोठणे पोलिस ठाण्यातील हे दोन्ही पोलिस कर्मचारी नागोठणे पोलिस ठाण्यातील आपल्या सेवेत पूर्ववत रूजू झाल्याने नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या या सहका-यांचे जोरदार स्वागत केले.

नागोठणे पोलिस ठाण्याच्या आवारातील प्रवेश द्वारातच पोलिस हवालदार मनोहर महाले व पोलिस नाईक जयेंद्र पाटील या कोरोना योद्धा पोलिस कर्मचाऱ्यांचे नागोठणे पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक प्रतीक्षा अमित गायकवाड यांच्याकडून औक्षण करण्यात आले. त्यानंतर नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक विजयकुमार देशमुख, निलेश महाडिक यांच्यासह उपस्थित सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या या दोन्ही कोरोना योद्धा सहका-यांचे पुष्पवृष्टी करुन स्वागत केले.
नागोठणे पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना काळात आपली सेवा बजावत असतांनाच कोरोनाची लागण होऊनही न डगमगता त्यावर आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात करुन पुन्हा सेवेत रूजू झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.