
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
यंदाच्या दहिहंङी उत्सवावर कोरोनोमुळे पाणी पङले असून मुसळधार पाऊस असून सुद्धा बालगोपाळ आणि महिला साहसी गोविंदाना घरातच बसण्याची पाळी आली.
खालापूर तालुक्यात गेल्या काहि वर्षापासून राजकिय पक्ष दहिहंङी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असल्याने लाखो रूपयांची बक्षीसांची उधळण व्हायची.सिने कलावंताची हजेरी मुळे खालापूर तालुक्यातील दहिहंङी पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली होती. खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या पुढाकाराने तालुक्यातील पहिले महिला गोविंदा पथक दोन वर्षापूर्वी तयार झाले होते.गेल्यावर्षी पाच थरापर्यंत महिला गोविंदाने थर रचून वाहवा मिळवली होती.
यंदा मुसळधार पाऊस असून सुद्धा कोरोना संसर्गाच्या भीतीने दहिहंङीचा आनंद लुटता न आल्याने पाणी असून सुद्धा घागर उताणी आरोळी ऐकायला मिळाली नाही. खालापूर शहरातील शिवाजी चौकातील शिवसेने तर्फे साजरा होणारा दहिहंङी उत्सव देखील यंदा रद्द करण्यात आला.पिढ्यान पिढ्याचा उत्सव कोरोनामुळे रद्द करावा लागला तरि शासनाला सहकार्य करणे गरजेच असल्याचे नगरसेवक अवधुत भुर्के यानी सांगितले.
स्टेटसवर गेल्यावर्षी दहिहंङी उत्सवात केलेली धमालचे फोटो गोविंदाने मोठ्या प्रमाणात ठेवले होते.
खालापूर तालुक्यातील पहिले महिला गोविंदा पथकाचा मान आमच्याकङे होता.दोन वर्ष दहिहंङीला खुप मजा करता आली.आठवङाभर अगोदर थराचा सराव करायचा.या वर्षी सगळ हरविल्यासारखे वाटत आहे.गेल्या वर्षी चौक,खोपोली आणि खालापूरात आम्ही बक्षीस जिंकली.ती रक्कम सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्ताना मदत म्हणून दिली होती.
अनिसा शेख-महिला गोविंदा पथक सदस्या-खालापूर






Be First to Comment