जागतिक आदिवासी दिना निमित्ताने उपक्रम
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
जागतिक आदिवासी दिना निमित्ताने अन्नदा संस्थेकडून नुकतेच सुधागड तालुक्यातील पावसाळा व दांड आदिवासी वाडीवर धान्य पाकिटांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ 900 आदिवासींना मिळाला.
जागतिक आदिवासी दिन पालीसह सबंध तालुक्यात विविध लोकोपयोगी, व समाजाभिमुख उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या महामारीत आदिवासी बांधवांना आपुलकीची साथ व मदतीचा हात देत अन्नदा संस्थेकडून तब्बल 900 आदिवासींना धान्य पाकिटांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी मोठ्या आपुलकीने आदिवासींना अन्न पाकिटे वाटण्यात आली. कुपोषणमुक्त भारत करणे हा अन्नदा संस्थेचा मूळ हेतू असून त्या दृष्टीने संस्था काम करत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र पाटील, उमेश खेरटकर, बबन शिंदे, कोंडू शिंदे व एकनाथ पवार आदी मान्यवर व आदिवासी बांधव उपस्थित होते.











Be First to Comment