उरण शहरात नगर परीषदेच्या पाणी विभागाच्या गलथान कारभारामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका
सिटी बेल लाइव्ह / रमेश थळी / उरण #
नगर परिषद कार्यालय गेटसमोर शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी जल वाहीनीला नियंत्रण करण्यासाठी रस्त्यावर व्हाॅल लावलेला आहे. हा व्हाॅल रस्त्याखाली असल्याने या व्हाॅल वरून अवजड वाहने जात असल्याने हा व्हाॅल वेळोवेळी नादुरुस्त होत असतो.
या व्हाॅलचे दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून मोठ्ठा खड्डा खोदून व्हाॅल रीपेरींगचे काम करतात. परंतू हे खोदकाम करण्यापूर्वी आपण ज्या व्हाॅलचे काम करणार आहोत या व्हाॅलचे पार्ट नगर परिषद स्टोर मध्ये आहेत का हे पहाणे पाणी पुरवठा कर्मचारी यांची जबादारी आहे. मात्र ते होत नसल्याने खोदकाम सुरू करून तो खड्डा पार्ट येई पर्यंत त्या अवस्थेत पार्ट मिळे पर्यंत तसाच राहतो. कधी पंधरा तर कधी महीनाभर हा खड्डा तसाच असतो. या रस्त्यावरून दररोज वाहनांची वर्दळ सुरू असते. सध्या मान्सुन सक्रिय असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष माळी यांनी या कामाकडे लक्ष केंद्रित करावे. खड्डा लवकरात भरून काढण्याचे आदेश मुख्य अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा कर्मचार्याना द्यावेत अशी मागणी उरण शहरातील जनतेतून होत आहे.






Be First to Comment