Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे डफली बजाव आंदोलन !

सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत कराव्यात : धर्मेंद्र मोरे

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्रदेश सदस्य मा.दिपकदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळात नागरिकांना किती अडचणींना सामोरे जावे लागले याचा पाढा शासनाला निवेदनाद्वारे देऊन लॉकडाऊन विरोधात डफली बजाव आंदोलन करण्यात आले .

सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत कराव्यात ही प्रमुख मागणी वंचीतचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांनी एस टी बस डेपो व्यवस्थापक यांना निवेदन देऊन करण्यात आली .

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की , 25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना करण्यात आल्या , सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादि ज्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी होईल अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. १०० टक्के लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत.

अर्थव्यवस्था संकटात आहे. अनेकांना बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच केलेली आहे.कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे , एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात , गणपती उत्सवासाठी खाजगी बस सेवा चालू होत असतील तर सरकारने सार्वजनिक बस वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे? सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत , सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आली .

यासंदर्भातील निवेदन आज मा.व्यवस्थापक, कर्जत बस डेपो यांच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. यावेळेस सर्व पदाधिकारी व कार्य
कर्ते यांनी डफली वाजवून आंदोलन केले. सदर आंदोलनात वंचित जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, अनिल गवळे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, युवा अध्यक्ष प्रदीप ढोले, सरचिटणीस राहुल गायकवाड, ललित हिरे, शहर पदाधिकारी लोकेश यादव, भारतीय बौद्ध महासभेचे कमलाकर जाधव, अशोक कदम, अनिकेत गायकवाड, सुनिल वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.