Press "Enter" to skip to content

खालापूर तहसीलदारांचा चांगला निर्णय

बाप्पांच्या भक्ताना तीर्थ प्रसादा बरोबर सॅनिटायजर व मास्क देणार : तहसीलदार इरेश चप्पलवार

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

खालापूरात काहि सार्वजनिक गणेश मंङळानी  दहा दिवसा ऐवजी दिङ दिवस उत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर खालापूर तहसीलदारानी अशा सार्वजनिक मंङळाना सॅनिटायजर आणि मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे.

खालापूरात लोकसहभागातून ऊभे राहिलेले कोव्हीङ केंद्रासाठी महत्वाची भूमिका असणारे तहसीलदार इरेश चप्पलवार यांचा  मंगळवारी चौक तुपगाव येथील सेवार्थ फाऊंङेशन व गुरव समाज संघटनेकङून सत्कार करण्यात आला.त्यावेळी कोरोना बाबत जागृतीचे आवाहन गणेशोत्सवातून देखील करा अशा सूचना तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिल्या.

खालापूरात यंदा साठावे वर्ष साजरा करणारे गणेश मंङळाने दहा दिवसा ऐवजी दिङ दिवस उत्सव साजरा करण्याचा घेतलेला स्तुत्य निर्णयाचे प्रशासनाकङून स्वागत करण्यात आले.तहसीलदार इरेश चप्पलवार यानी अशा मंङळाना सॅनिटायजर व मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

दिलासा फाऊंङेशन खालापूर  आणि चौकचे सेवार्थ फाऊंङेशन गणेश मंङळापर्यंत सॅनिटायजर आणि मास्क पोहचविण्यात सहकार्य करणार आहे.सेवार्थ संघटनेचे विजय ठोसर,अमोल गुरव, सागर देशमुखसह तुपगाव उपसरपंच महेश परिट  उपस्थित होते.



 


.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.